किणे गावच्या फौजी ग्रुप कडून अपघातग्रस्त गुडुळकर कुटुंबाला मदतीचा हात

 कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किणे या गावात दिनांक 27/07/ 2023 रोजी अतिवृष्टीमुळे घराची भिंत पडून सौ. सुनीता अर्जुन गुडूळकर यांचे भिंतीखाली सापडून आकस्मित निधन झाले होते.  सौ. अर्जुन गुडूळकर ह्या त्यांच्या घराच्या आधारस्तंभ होत्या त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या काबाडकष्टातूनच होत होता आणि झालेल्या ह्या अपघातामुळे त्यांचे कुटुंब  कोलमडून पडले होते त्यामुळे कीणे गावातील अनेक मंडळांनी एकत्र येऊन त्यांना काही ना काही आर्थिक मदत केली आहे . यामध्ये संकल्प ग्राम विकास मंडळ व किने ग्रामस्थ मंडळ मुंबई तसेच बाकी मंडळांनीही त्यांना मदत केली आहे.  किने गावची ओळख फौजींचं गाव अशी कोल्हापूर जिल्ह्यात आहे व गावातील कोणत्याही कार्यक्रमात फौजी ग्रुपचा मोलाचा वाटा असतो  शाळेतील मुलांचा गुणगौरव असो किंवा गावातल्या कुठल्याही अडचणीला एकत्र येऊन मदत करतात तसेच गुडूळकर फॅमिलीच्या पडलेल्या घराच्या पुनर्निर्मितीसाठी त्यांनी काही रकमेच्या स्वरूपात त्यांच्या कुटुंबीयांना देऊन मदत केली

फौजी ग्रुप किणे चे ना.सुभेदार सचिन दळवी. हवा.प्रकाश आजगेकर व लक्ष्मण तुपट व संतोष गुरव

फौजी ग्रुपचे सुट्टीवर असलेले ना सुभेदार सचिन दळवी व हवालदार प्रकाश आजगेकर यांनी अर्जुन गुडुळकर यांच्या घरी जाऊन  त्यांचे सांत्वन केले व भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींना मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच फौजी ग्रुप किने गावातील एका अनाथ मुलीला शिक्षणासाठी मदत करत आहे व भविष्यात ही करत राहील असे ग्रुपच्या सदस्याकडून सांगण्यातआले आहे

फौजी ग्रुप किणे मध्ये सुभेदार राजेंद्र केसरकर , सचिन दळवी  प्रमोद गुडुळकर प्रवीण तुप्पट यशवंत शिंदे अन्य 55 सदस्य व एक महिला सदस्य आहेत 



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

LIC POLICY HOLDER को मिला रहा एलआईसी आईपीओ मै बड़ा डिस्काउंट अगर आप पॉलिसी धारक है तो आप भी पा सकते है एलआईसी आईपीओ मै छूट ।

मंदी के दौर में तेजी से भागता शेयर - 02 दिन दिया 12 % का return